साहित्य:
* १/२ किलो कोळंबी
* १ मोठा कांदा बारिक चिरुन
* १ मोठा टोमॅटो फोडि करुन किंवा बारिक चिरुन
* १ चमचा भरुन बारिक चिरलेली कोथींबीर (सजावटिसाठि)
मसाला पुडः
* तिखट, हळद, धने-जिरे पुड, गरम मसाला - चवी प्रमाणे
आख्खा मसाला:
* ८-१० काळी मिरि
* ४-५ लवंगा
* १" दालचिनी
कृती:
* कोळंबीला तिखट आणि मीठ लावुन २० मिनीटे मुरण्यासाठि ठेवावे
* एका पॅनमधे तेल गरम करुन आख्खा मसाला परतुन घ्यावा (सुगंध दरवळेपर्यंत)
* बारिक चिरलेला कांदा घालुन सोनेरी होईपर्यंत परतुन घ्यावा
* चिरलेला टोमॅटो घालुन मउ होईपर्यंत परतुन घ्यावा
* हळद, तिखट, धने-जिरे पुड आणि गरम मसाला घालावा.
* तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतुन घ्यावे
* आता कोळंबी घालुन छान हलवुन घ्यावे. मसाला कोळंबीला व्यवस्थित लागला पाहिजे.
* थोडा वेळ हलवुन कोळंबी झाकुन ठेवा आणि १०-१५ मिनीटे होउ द्या.
* मसाला कोळंबी तयार आहे. बारिक चिरलेली कोथींबीर घालुन गरमागरम भाताबरोबर वाढा.